महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Diwali Holiday : दिवाळी सुट्टीचे एसटीकडून नियोजन, पुण्यासाठी 90 तर धुळे मार्गावर 15 मिनिटाला बस - Tourism Increased in Nashik

दिवाळीमुळे शाळा, महाविद्यालयासह खाजगी शासकीय, आस्थापनाला असलेल्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली ( Tourism Increased in Diwali Festival ) आहे. यामुळे एसटी महामंडळाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष प्रयत्न केले जात ( ST corporation Aim to Get More Income In Diwali ) आहे.

Diwali Holiday
दिवाळी सुट्टीचे एसटीकडून नियोजन

By

Published : Oct 26, 2022, 9:38 AM IST

नाशिक :दिवाळीमुळे शाळा, महाविद्यालयासह खाजगी शासकीय, आस्थापनाला असलेल्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली ( Tourism Increased in Diwali Festival ) आहे. यामुळे एसटी महामंडळातून प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक, पुणे महामार्गावर रोज 90 फेऱ्या तर नाशिक - धुळे महामार्गावर दर पंधरा मिनिटाला बसेस सोडण्यात येत ( Tourism Increased in Nashik ) आहे. दिवाळीच्या कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष प्रयत्न केले जात ( ST corporation Aim to Get More Income In Diwali ) आहे.

उत्सवात अधिक उत्पन्न मिळावे :करोनाचे निर्बंध हटवल्यामुळे यंदा सर्वत्र दिवाळीचा उत्साह नागरिकांमध्ये दिसून येत आहे. गावी व पर्यटनस्थळी जाण्यासाठी नागरिक पसंती देत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन बस स्थानक आणि महामार्ग बस स्थानक या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेत एसटीने यंदा ज्यादा बसेस सोडण्याचे नियोजन केले ( ST corporation Increased passengers bus ) आहे. सर्वाधिक प्रवाशी नाशिक-पुणे महामार्गावर असल्याने या मार्गावर सर्वाधिक 90 फेऱ्या होत आहेत. त्या पाठोपाठ धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर या मार्गावर नवीन बस स्थानक येथून दर पंधरा मिनिटाला बस सोडण्यात येत आहे. या सण उत्सवात अधिक उत्पन्न मिळावे यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.

प्रवाशांची पळवापळवी :नवीन बसस्थानक बाहेर गावी जाणार प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. एकीकडे एसटी महामंडळाकडून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना,दुसरीकडे मात्र खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून थेट बस स्थानकातून पप्रवाशांची पळवापळवी होत आहे. विशेष म्हणजेएसटी अधिकाऱ्यांकडूनही या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिवाळीतील सुट्ट्यांचा कालावधी लक्षात घेता शहरातील नवीन बसस्थानकात प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी एसटी महामंडळ या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details