नाशिक -आजपासून नाशिक शहर व मालेगाव कंटेनमेंट झोन वगळता नाशिक जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. 35 बसेसच्या माध्यमातून 254 फेऱ्या केल्या जाणार आहे. नाशिक शहर व शहराबाहेर एक ही बसेस जाणार व येणार नसल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकरी कैलास पाटील यांनी दिली.
नाशकातील दहा तालुक्यांमध्ये एसटीची सेवा सुरू - नाशिक लेटेस्ट न्युज
नाशकातील १० तालुक्यामध्ये एसटीची सेवा सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार असून एका बसेसमध्ये 22 प्रवासी बसवण्यात येणार आहे. तसेच मास्कचा वापर अनिवार्य आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार असून एका बसेसमध्ये 22 प्रवासी बसवण्यात येणार आहे. तसेच मास्कचा वापर अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे 9 मे पासून परप्रांतीय मजुरांसाठी नाशिक व ठाणे येथून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी 1781 बसेसच्या माध्यमातून 39 हजार 182 प्रवाशांना मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आदी राज्यांच्या सिमेपर्यंत सोडण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. एप्रिल व मे हा महिना प्रवाशांच्या गर्दीने फुलेला असतो. त्यामधून प्रति दिवसाला १ कोटी महसूल मिळतो. मात्र, गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊन असून महामंडळाचा 60 कोटी रुपयाचा महसूल बुडाला आहे, असेही ते म्हणाले.