नाशिक- औरंगाबाद राज्य महामार्गावर येवल्याजवळ दोन कारची धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना येवल्याजवळ गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.
येवला येथे दोन कारच्या अपघातात ५ जण गंभीर जखमी - Car Accident Yeola Aurangabad State Highway
रस्त्याच्या कडेला कार उभी होती. दरम्यान, पाठीमागून आलेल्या ब्रिझा कारने उभ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून उभ्या असलेल्या कारमधील महिलांना जबरदस्त मार लागल्याचे सांगितले जाते आहे.
अपघाताचे दृश्य
येवल्याजवळ रस्त्याच्या कडेला एक कार उभी होती. दरम्यान, पाठीमागून आलेल्या ब्रिझा कारने उभ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून उभ्या असलेल्या कारमधील महिलांना जबरदस्त मार लागल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर, दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून जखमींना येवला येथील काकड खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा-नाशिकमध्ये अवैध मद्यसाठा जप्त, १६ लाखांचा मद्देमाल जप्त