येवला : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा उद्घाटन समारंभ होणार असून या अयोध्याच्या श्रीरामा करता खास येवल्यातील कापसे फाउंडेशनमधील शेकडो दिव्यांग कारागिर, तसेच रामभक्त विणकरांनी रेशीम धाग्याच्या साह्याने विणकाम करून पैठणीचे वस्त्र तयार केलंय. या श्रीरामाच्या पैठणी वस्त्राला सोने व चांदीच्या जरीसह नैसर्गिक फुलांचा रंगदेखील वापरण्यात आलाय. श्रीरामाच्या अंगावर येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी असलेला शेला आता परिधान होणार आहे.
अयोध्येच्या श्रीरामांसाठी पैठणीचे वस्त्र
वस्त्र तयार करण्यास लागला सहा महिन्यांचा कालावधी :श्रीरामासाठी रेशीम धाग्याच्या साह्यानं पैठणी वस्त्र तयार करण्यात आले असून हे वस्त्र तयार करण्यासाठी येथील विणकारांना जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. यावेळी भगव्या रंगाचा शेला हा श्रीरामांसाठी तयार करण्यात आला आहे. तसेच श्रीरामांच्या मूर्तीला पितांबर देखील या विणकारांनी आपल्या हाताच्या साह्यानं विणकाम करून तयार केलं आहे.
वस्त्राला नैसर्गिक रंग :रेशीम धाग्यांच्या साह्यानं श्रीरामासाठी वस्त्र तयार करण्यात आलं असून याकरता नैसर्गिक फुलांच्या रंगांचा वापर वस्त्रात करण्यात आला. या वस्त्रात सोन्या-चांदीच्या जरीचा देखील वापर करण्यात आला आहे.
251 किलो गीर गायीचे तूप : कापसे फाउंडेशन येथील अहिल्याबाई होळकर गौशाळेमध्ये शेकडो गीर गाई आहेत. या गीर गाईंचे तूप देखील तयार करण्यात आले असून जवळपास २५१किलो तूप हे अयोध्या येथे होणाऱ्या होम हवन व इतर कार्यक्रमासाठी पाठवण्यात येणार आहे. याकरीता हे गीरगायचे तूप आकर्षक अशा कलशा मध्ये भरण्यात आलं आहे. त्याचबरोबर शेणाच्या गौवऱ्या तसेच दिवे देखील यावेळी तयार करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे बाळासाहेब कापसे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम 16 जानेवारीपासूनच होणार सुरू, कसा होणार अभिषेक?
- २२ जानेवारीला दक्षिण- मध्य मुंबईत लखलखणार एक लाख दिवे
- नागपुरातील श्रीरामाचा असाही एक भक्त; १००१ लोकांच्या हातावर गोंदवतोय 'श्री रामा'चं नाव अन् तेही फ्री