नाशिक -कोरोनामुक्तीनंतर महिलांना थकवा, अंगदुखी सारख्या समस्या सामोरे जावे लागत आहे. अशात महिलांनी तत्काळ वैद्यकीय सल्ला घेत प्रथिनेयुक्त आहार आणि व्यायाम करण्याचा डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोनामुक्तीनंतरही अनेक महिलांना थकवा, अंगदुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा जेणेकरून पुढील धोका टाळता येऊ शकतो, असे डॉक्टरांनी सागितले आहे. कोरोना काळात शरीराची बहुतांशी झीज झालेली असते. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ धाप लागणे, अशक्तपणा सारखी लक्षणे आढल्यास याकडे दुर्लक्ष करू नये, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर होण्याची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक आहे. पण, असे असले तरी कोरोनामुक्त झाल्यानंतरही सतर्क राहणे गरजेचे आहे. आहारात मासे, अंडी, चिकन, पालेभाज्या, कडधान्य यांसारखे प्रथिनेयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. तसेच पुरेशी झोप, व्यायाम, योगा करणे गरजेचे असल्याचे डॉ. वृषाली व्यवहारे यांनी सांगितले आहे.
मोकळ्या हवेत फिरावे