नाशिक- आमचे सरकार आल्यावर पीक विमा आणि कर्जमुक्तीचे विषय मार्गी लावू, असे आश्वासन शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी आज त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ केला. यावेळी त्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन चांगला पाऊस पडू दे आणि राज्याला दुष्काळ मुक्त होऊ दे, अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात अभिषेकही केला. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी त्र्यंबकेश्वरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आमचे सरकार आल्यावर पीक विमा आणि कर्जमुक्तीचे विषय मार्गी लावू -आदित्य ठाकरे
जन आशीर्वाद यात्रेला प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असून, ज्यांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार तसेच ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी मी आपल्यात आलोय, असे आदित्य म्हणाले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, सत्तेत असून गेली पाच वर्ष शिवसेनेने लोकांसाठी संघर्ष केला, जनता ही शिवसेनेमागे ठामपणे उभी राहिली. त्यांचे आभार आणि आशीर्वाद घेण्यासाठी मी महाराष्ट्रात फिरतोय, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण सत्तर टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण या तत्वावर मी काम करत असून पुढे अजून खूप काम करायचे असल्याचे आदित्य यांनी सांगितले.
जन आशीर्वाद यात्रेला प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असून, ज्यांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार तसेच ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी मी आपल्यात आलोय, असे आदित्य म्हणाले. आमचे मंत्री चांगल्या प्रकारे काम करत असून, लवकरच त्र्यंबकेश्वर परिसरातील धरणाच्या बाजूच्या आलेल्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवू, आमचे सरकार आल्यावर जलसंधारणाची कामे करू, यासोबत पिक विमा कर्जमुक्तीचे विषयही मार्गी लावू, असेही आदित्य ठाकरे यांनी जनतेला आश्वासन दिले.