नाशिक - मालेगाव तालुक्यातील माणके गावचे रहिवासी जवान मनोराज शिवाजी सोनवणे (वय 35)सीमेवर तैनात असताना त्यांना वीरमरण आले. याबाबत अधिक माहिती मालेगाव तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सोनवणे हे २१ पॅराट्रूप स्पेशलमध्ये काम कार्यरत होते. दहा दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमधील देशाच्या सीमेवर तैनात असताना बदलत्या वातावरणामुळे त्यांची तब्येत खालावली. यानंतर त्यांना कोलकात्यातील कमांड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अरुणाचल प्रदेशातील सीमेवर मालेगावच्या सुपुत्राला वीरमरण! - soldiers from nashik
मालेगाव तालुक्यातील माणके गावचे रहिवासी जवान मनोराज शिवाजी सोनवणे (वय 35)सीमेवर तैनात असताना त्यांना वीरमरण आले. याबाबत अधिक माहिती मालेगाव तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
माणके येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. ते 2005 मध्ये मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. तर 2009 मध्ये 21 पॅरा कमांडो दलात ते सेवा देत होते. मनोराज यांच्या पश्चात्य आई, वडील, भाऊ,पत्नी, सहा वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
पालकमंत्र्यांची श्रद्धांजली
ही घटना कळताच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना नाशिक जिल्ह्यातील माणके- चिखल ओहोळ येथील रहिवासी वीर जवान मनोराज सोनवणे शहीद झाले, असे भुजबळ म्हणाले. मनोराज सोनवणे हे सोळा वर्षांपासून भारतीय लष्करातील मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते. २१ पॅराट्रूप या स्पेशल फोर्समध्ये देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांची तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाने देशाने एक वीर जवान गमावला आहे. मनोराज सोनवणे यांना राज्य सरकारच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!