नाशिक- पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या प्रलयकारी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपली घरे सोडून मदत शिबिरांमध्ये जावे लागले आहे. त्याच्या मदतीसाठी सैन्यदल ,पोलीस प्रशासन ,सेवाभावी संस्था दिवसरात्र कार्यरत आहे. त्यांना प्रतिकूल परिस्थितीत परिपूर्ण आहार मिळावा यासाठी जिल्ह्यातील उद्योजक संदीप सोनवणे यांनी ३० हजार कडकनाथ कोंबडीची अंडी आज कोल्हापूरकडे रवाना केली आहेत.
पूरग्रस्त भागात मदत करणाऱ्या जवानांना कडकनाथ अंड्यांची मदत - Sandeep Sonawane sent 30,000 Kadaknath hen eggs to jawans
व्यवसायातील नफा दुर्लक्षित करून संदीप सोनवणे यांनी कर्तव्य भावनेतून पूरस्थितीत काम करणाऱ्या सैन्यदल, व इतर सुरक्षा यंत्रणांची मदत करण्याचे ठरविले. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालय व कोल्हापुरातील काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर वाटपाचे नियोजन करुण त्यांनी ३० हजार कडकनाथ कोंबडीची अंडी कोल्हापूरकडे रवाना केली.

व्यवसायातील नफा दुर्लक्षित करून संदीप सोनवणे यांनी कर्तव्य भावनेतून काम करणाऱ्या सैन्यदल, व इतर सुरक्षा यंत्रनांची मदत करण्याचे ठरविले. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालय व कोल्हापुरातील विशिष्ट अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर वाटपाचे नियोजन करुण त्यांनी ३० हजार कडकनाथ कोंबडींची अंडी कोल्हापूरकडे रवाना केली.
या पथकात प्रशांत गुजराथी, प्रीतम भट, अभिजीत इंगोले, संदीप पंचभाई, सुदाम राठोड ,भानुदास महाले, दिलीप राठोड यांचा समावेश आहे. या पथकामार्फत कोल्हापूर येथील मदत शिबिरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कडकनाथ अंड्यांचे वितरण करण्यात येणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत पूरग्रस्तांची मदत करणाऱ्या जवानांना एक परिपूर्ण आहार मिळावा तसेच पूरपरिस्थितीत त्यांची रोग प्रतिकारक शक्ती प्रभावी राहावी, हाच या मागचा हेतू असल्याचे संदीप सोनवणे यांनी सांगितले.