येवला(नाशिक) - शहरातील रामचंद्र भगत यांच्याकडे तीन रेडे आहेत. ते दर पाडव्याला या रेड्यांची मिरवणूक काढत असतात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्यांनी आपल्या रेड्यावर "कोरोना एक अशी शर्यत जिथं धावणारा नाही थांबणारा जिंकेल" असा जनजागृतीपर संदेश रेखाटला. तसेच पाडव्याच्या दिवशी सायंकाळी रेड्याची शहरातून मिरवणूक काढली. या रेड्यावर कोरोना योद्धा असलेले पोलीस, डॉक्टर्स, नर्स यांचेही चित्र रेखाटले होते.
हेही वाचा -विहिरीत पडलेल्या गवा रेड्याची अखेर जेसीबीच्या साहाय्याने सुटका