नाशिक- येवला तालुक्यातील पिंपळगाव-जलाल येथील जय तुळजा भवानी मित्र मंडळ दरवर्षी सायकल यात्रेचे आयोजन करते. या वर्षीही ऊन, वारा, पाऊस, थंडीची तमा न बाळगता येवला पिंपळगाव-जलाल ते तुळजापूर-अक्कलकोट सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल यात्रेतून सामाजिक संदेश; येवल्यातील जय तुळजा भवानी मित्र मंडळाचा उपक्रम - yewala cycle gang
सायकल यात्रेद्वारे दरवर्षी एक सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची जनजागृती करत जय तुळजा भवानी मित्र मंडळ प्रबोधन करते. आणि एक वेगळा संदेश समाजात रुजवण्याचा प्रयत्न करते. यावर्षीही 40 सायकलस्वार या यात्रेत सहभागी झाले असून त्यांनी आपल्या सायकलीवर विविध संदेश फलक लावले आहेत.
सायकल यात्रेद्वारे दरवर्षी एक सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची जनजागृती करत जय तुळजा भवानी मित्र मंडळ प्रबोधन करते. एक वेगळा संदेश समाजात रुजवण्याचा प्रयत्न करते. 14 वर्षांपासून अविरत कुठलाही खंड न पडता ही सायकल यात्रा चालू आहे. यावर्षी 40 सायकलस्वार या यात्रेत सहभागी झाले असून त्यांनी आपल्या सायकलीवर विविध संदेश फलक लावले आहेत.
'या सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा', 'आधी विद्यादान मग कन्यादान', 'वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा', 'अवयव दानाने येणार क्रांती गरजुंच्या घरी नांदेल सुख शांती', 'कापडाची पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी', 'भांडणापेक्षा समझोता बरा मिळेल त्यात आनंद खरा', 'कोणाची वाट आडविण्यापेक्षा पाणी अडवा', 'धूम्रपान मद्यपान आयुष्याची धूळधान', असे विविध संदेश फलक लावून हे सायकल स्वार यात्रा करीत आहेत.