नाशिक : नागाच्या चुंबनाचा प्रयत्न करताना सर्पमित्राने जीव (snake charmer died in Nashik) गमावला. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना नागाने सर्पमित्राच्या ओठांना दंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली (snake charmer died while trying to kiss kobra) आहे. नागेश भालेराव असे मृत सर्पमित्राचे नाव आहे.
चुंबन घेण्याच्या प्रयत्नात ओठांचा चावा :मिळालेल्या माहितीनुसार सर्पमित्र नागेश भालेराव हा एका वर्कशॉपमध्ये काम करत होता. शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला नाग त्याने सिन्नर महाविद्यालयासमोरील एका कॅफेमध्ये आणला. कॅफेचालक त्याचा मित्र असल्याने आणखी तीन मित्रांसमवेत कॅफेच्या वर बिल्डिंगच्या गच्चीवर नागेश हा मित्रांसमोर नाग घेऊन गेला. यावेळी नागेशने नागाचे चुंबन घेण्याच्या प्रयत्नात ओठांचा चावा (snake charmer kiss kobra snake) घेतला.