नाशिक: महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार असून कुठेही गो-हत्या होणार नाही. याची पुरेपूर काळजी घेत असताना, एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. देवळाली कॅम्प परिसरात तीन अज्ञात इसम भररस्त्यात पहाटे एका गाईला आपल्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये कोंबून भरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे, आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 22 मे रोजी पहाटे चार वाजेची ही घटना आहे. देवळाली कॅम्प नवीन बस स्थानक जवळ असलेल्या चौकात हा प्रकार घडला आहे. याबाबत अनेक हिंदुत्ववादी संघटना व गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तर या झालेल्या प्रकाराचा निषेध करत तातडीने या कारचा मालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प परिसरात तीन अज्ञात इसम भररस्त्यात पहाटे, एका गाईला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये कोंबत होते. तातडीने या कारचा मालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करणार. - अनिकेतशास्त्री महाराज
पोलिसांनी केला पाठलाग:पोलीस ठाणे परिसरात असे प्रकार होत असल्यामुळे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांची मोबाईल व्हॅन रात्रभर फिरत असताना त्यांना ही घटना कशी लक्षात आली नाही, या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकाराची सखोल तपास करून कारवाई करावी अशी मागणी, नागरिकांनी केली आहे. पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन सदर कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांची चाहू लागताच गोवंश तस्करांनी भरधाव वेगाने कार चालवत धूम ठोकल्याचे पोलिसांच म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून अज्ञात तीन संशयित व्यक्तींन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहे.
देवळाली पोलीस प्रशासन कधी कारवाई करणार?मागच्या वर्षी भर दिवाळीत 3 गाईंची निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्या दोषींवर अजून कारवाई झाली नाही. आता पहाटे पुन्हा एकदा कत्तलीसाठी गाय चोरून नेत आहेत. गावो विश्वस्य मातर: गाय या जगाची माता आहे. आज गाईंची कत्तल होते आहे, उद्या आमच्या आयाबहीणींची कत्तल झाल्यावर प्रशासननाला जाग येणार आहे का?. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना मी मागणी करण्यात आली की, लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा सर्व संत समाज व हिन्दुत्ववादी संघटने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे महंत पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री महाराज यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -
- High Court Lucknow Bench गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचा निर्णय
- गोहत्या बंदी कायद्याचा परिणाम कर्नाटकातील गायींना अच्छे दिन मात्र वाघसिंहाची उपासमार
- जोपर्यंत मी आहे गोहत्या बंदी नाही रावसाहेब दानवेंचा व्हिडिओ व्हायरल