नाशिक- सहा महिन्याच्या चिमुरड्याच्या गळ्यात विक्सची डबी अडकल्याची घटना मगंळवारी सायंकाळी घडली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता त्याला अत्यावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दीड तासांच्या अवघड शस्रक्रियेनंतर गळ्यात अडकलेली विक्सची डबी बाहेर काढून चिमुरड्याला जीवनदान दिले.
चिमुरड्याने गिळली विक्सची डबी; दीड तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीवनदान - operation
डॉक्टरांनी दीड तासांच्या अवघड शस्रक्रियेनंतर गळ्यात अडकलेली विक्सची डबी बाहेर काढून चिमुरड्याला जीवनदान दिले.
निलेश संदिप केकरे, असे या चिमुरड्याचे नाव असून तो इगतपुरी तालुक्यातील आवळखेड येथील आहे. गळ्यात अडकलेल्या डबीमुळे निलेशला श्वास घेता येत नव्हता. त्यामुळे तो बेशु्द्ध पडला होता. त्यामुळे डॉ. संजय गांगुर्डे यांनी तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. गांगुर्डे यांच्यासह डॉ. दीपाली चौधरी, डॉ. तडवी, डॉ. पटेल यांनी ही शस्त्रक्रिया केली.
निलेशची शस्त्रक्रिया लवकर झाली नसती तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. डॉक्टरांच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर निलेशला जीवनदान दिले. डॉक्टरांच्या याच पथकाने नाणे गिळलेल्या ५ लहान मुलांना याआधी जीवनदान दिले आहे.