नाशिक - जिल्ह्याच्या येवला शहरात आज नव्याने 16 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यात 1 वर्षाच्या चिमुकलीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
नाशिक : येवल्यात 16 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 1 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश - नाशिक कोरोना रुग्णसंख्या बातमी
येवला शहरात आज 16 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून या रुग्णांमध्ये 1 वर्षाच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे. यामुळे, तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 83 वर जाऊन पोहचली आहे. तर, आत्तापर्यंत तालुक्यात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या उर्वरित 28 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढतच चालले आहे. यात आज (बुधवार) 16 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून या रुग्णांमध्ये एका वर्षाच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे. यामुळे, तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 83 वर जाऊन पोहोचली आहे. तर, आत्तापर्यंत तालुक्यात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या उर्वरित 28 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काल (मंगळवार) 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर 26 जणांचे चाचणी अहवाल येणे बाकी होते. ते अहवाल आज प्राप्त झाले असून यातील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, एक वेळ अशी होती की येवला तालुका हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र, आता हळूहळू कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवस रुग्णसंख्या ही कमी होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरात रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली असून शहरात मोठी चिंतेची बाब ठरत आहेत.