नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावात शनिवारी सायंकाळी सात वाजता घरात खेळत असलेल्या सहा वर्षाच्या मुलावर बिबट्याने झडप टाकून उचलून ( six year old boy killed in leopard attack ) नेले. वन विभागाच्या पथकाने शोध घेतल्यानंतर अडीच तासाने अर्धा किलोमीटर दूर वाघेरा रस्त्यावर झाडा झुडपात मुलाचा मृतदेह ( boy dead bodyfound half kilometer away ) आढळला. हरीश निवृत्ती दिवटे असे मृत मुलाचे नाव आहे.
हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा ठार :मिळालेल्या माहितीनुसार हरीश आपल्या बहिणीसोबत घरात खेळत होता. त्यावेळी अचानक आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप टाकली. आपल्या जबड्यात हरिशला उचलत त्याने धूम ( Six year old boy killed in Nashik leopard attack ) ठोकली. बहिणीने आरडाओरडा केल्याने गोठ्यात दूध काढत असलेले आजोबा धावत आले. नंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी परिसरात शोध सुरू केला. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी व विवेक भदाणे हे घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा वाघेरा रस्त्यावर हरिशचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला ( cage installed to capture leopard ) आहे.