महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 2, 2023, 7:50 PM IST

Updated : Mar 2, 2023, 10:58 PM IST

ETV Bharat / state

Paan House Nashik : अबब...! तब्बल दीड लाखाचे पान; 600 प्रकारचे फ्लेव्हर्स

अनेक नागरिकांना जेवणानंतर पान खायला आवडते. या पानप्रेमींना विविध प्रकारच्या पानांची चव चाखता यावी यासाठी माऊली फॅमिली पानहाऊस गेल्या 8 वर्षांपासून नाशिकमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 600 प्रकारच्या पानांची विक्री होते. या पानाची किंमत रु. 25 ते दीड लाखापर्यंत आहे.

Mauli Family Panhouse
Mauli Family Panhouse

माऊली फॅमिली पानहाऊस

नाशिक :भारतात पानाचे शौकीन खूप आहेत. अनेक नागरिकांना जेवण झाल्यानंतर पान खायला आवडतं. याच पान शौकिनांना वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचा आस्वाद मिळावा यासाठी नाशिकमध्ये माऊली फॅमिली पानहाऊस गेल्या 8 वर्षांपासून कार्यरत आहे. इथं एक-दोन नव्हे तर तब्बल 600 प्रकारचे पान मिळतात. 25 रुपयांपासून ते दीड लाखांपर्यंत पान इथं उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिकला येणारे पर्यटक हमखास पान खाण्यासाठी येत असतात..

तब्बल दीड लाखाचे पान

दीड लाख रुपयांपर्यंत पान :नाशिकच्या मखमलाबाद येथे राहणाऱ्या गणेश डुकरे या तरुणाने बीए डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने नोकरीचा शोध घेतला, मात्र मनासारखी नोकरी न मिळाल्याने त्याने स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. गणेशने मखमलाबाद भागात एका हॉटेलमध्ये माऊली फॅमिली पान हाऊस सुरु केले. गणेशने सुरवातीला पुणे येथे जाऊन पान दुकानात काम करून पानाचा अभ्यास करून विविध प्रकारचे फ्लेवर पान तयार करण्याचे शिक्षण घेतले. गणेशकडे आता तब्बल 600 पेक्षा अधिक प्रकारचे पानांचे फ्लेवर आहेत. अगदी 25 रुपयांपासून तर पेशवाई गोल्डन नावाचे दीड लाख रुपयांपर्यंत पान तो ऑर्डर नुसार बनवतो.


'हे' मिळतात पान :माऊली पान हाऊसमध्ये पान शौकिनांना नवाबी पान, चीज चॉकलेट,चंदन मसाला पान, पान, खसखस स्पेशल पान, राजधानी एक्सप्रेस पान, रजनीकांत पान, महफिल पान, मथुरा पॅटर्न पान, इंदोर पॅटर्न पान, गुलाब मसाला पान, केशरी कस्तुरी पान, नाईट कविन पान, मुमताज स्पेशल पान, सिल्व्हर मसाला पान, विजयवाडा पॅटर्न पान, ही मसाला स्पेशल पान, फ्रुट पान अशा तब्बल सहाशे प्रकारचे पान इथं मिळतात. त्यामुळे बच्चे कंपनी पासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांच्या आवडीनुसार पान इथं तयार करून मिळते.

'मी' नियमित पान खातो :मागील दहा वर्षापासून मी नियमित पान खातो. जेवण झाल्यानंतर रात्री फेरफटका मारताना न चुकता मी पान स्टॉलवर येऊन पान खातो. यांच्याकडे 600 हुन अधिकवेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत. यात अनेक आयुर्वेदिक पान आहे. जे आरोग्यासाठी चांगले आहे. पान खाल्ल्यानंतर पचनक्रिया चांगली होते असे म्हटले जाते. आतापर्यंत सर्वच पान फ्लेवर मी ट्राय केले आहे असे एका ग्राहकाने सांगितले.

पान खाण्याचे फायदे :ताप,सर्दी सारखी समस्याच निर्माण होत असले तर. पान खाणे हा यावर एक चांगला उपाय मनाला जातो. फुफ्फुसांशी संबधीत आजार झाल्यास पानचे सेवन केले पाहिजे. जर श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असले तर, गरम पाण्यात पानासह लवंग, वेलदोडा टाकत पाणी अर्धे होईस्तोवर उकळावे. त्यानंतर पाणी थंड झाल्यानंतर ते पाणी पिल्याने आराम मिळतो असे आयुर्वेदात म्हटले आहे.


हेही वाचा -Patra Chawl Scam Case : संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याबाबत ईडीच्या पदरी निराशा; आता पुढील...

Last Updated : Mar 2, 2023, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details