महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक शहराची तहान भागवायची असेल तर पाणीकपात करा - सिताराम कुंटे

जिल्हाधिकारी, महापालिका व पाटबंधारे विभाग यांनी एकत्रित बैठक घेऊन पाणी कपातीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश कुंटे यांनी दिले आहेत. कुंटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील दुष्काळ दौऱ्याची माहिती देताना ते बोलत होते.

नाशिक शहराची तहान भागवायची असेल तर पाणीकपात करा - सिताराम कुंटे

By

Published : May 17, 2019, 4:48 PM IST

नाशिक- गंगापूर धरणात 31 जुलैपर्यंत शहराची तहान भागवेल एवढेच पाणी सध्या स्थितीत शिल्लक आहे. पावसाला होणारा विलंब लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शहरात पाणीकपात लागू केली पाहिजे, अशी सूचना जिल्हा पालक सचिव सीताराम कुंटे यांनी केली आहे.

नाशिक शहराची तहान भागवायची असेल तर पाणीकपात करा - सिताराम कुंटे

जिल्हाधिकारी, महापालिका व पाटबंधारे विभाग यांनी एकत्रित बैठक घेऊन पाणी कपातीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश कुंटे यांनी दिले आहेत. कुंटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील दुष्काळ दौऱ्याची माहिती देताना ते बोलत होते.

शहरासाठी 4 हजार 900 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असून त्यापैकी 3 हजार 447 दशलक्ष घनफूट पाणी महापालिकेने वापरले आहे. सद्यस्थितीत नाशिक शहराची तहान भागवण्यासाठी प्रतिदिन 16.18 दशलक्ष घनफूट पाणी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आणि पाणीपुरवठा विभाग व पाटबंधारे विभाग यांची बैठक घेऊन शहरातील पाणी कपातीचा निर्णय घ्यावा अशी सूचना कुंटे यांनी केली आहे. पाणीकपातीचा निर्णय घेताना तो एकतर्फी न घेता पाणी पुरवठ्याची संबंधित सर्व विभाग व नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जावा असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details