माहिती देताना बोर्डाचे अध्यक्ष नितीन उपासनी नाशिक:दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सध्या सुरु आहे. सर कृपया मला पास करून द्या, मी खूप गरीब आहे, तुम्ही पास नाही केले तर माझ्यासमोर संकट उभे राहील, त्यामुळे पासिंगचे मार्ग देऊन टाका, अशा प्रकारचा मजकूर उत्तर पत्रिकेत लिहून दहावी, बारावीच्या जवळपास 50 विद्यार्थ्यांनी पेपर तपासणीकांसमोरच संकट उभ केले आहे.
कुठे भावनिक आव्हान तर कुठे आत्महत्याची धमकी: काही महिन्यापूर्वीच पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्यात, काही दिवसातच आता याचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तर पत्रिकेतील अजब मजकूर ऐकून तपासणीकांन समोर मोठे संकट उभ राहिल आहे. सर, मला पास करा, नापास झाल्यास घरचे लग्न लावून देतील, त्यामुळे पुढचे शिक्षण घेता येणार नाही. मी खूप गरीब असून आमच्यावर खूप कर्ज आहे. मला पास केल्यास चांगली नोकरी करून कर्ज फेडू शकेल असे भावनिक आव्हान केले.
नियमाप्रमाणेच मार्क दिले जाणार: तर काही विद्यार्थ्यांनी कठीण विषयांच्या पेपरला पास करण्यासाठी उत्तर पत्रिकेमध्ये विनंतीचे संदेश लिहिले. तर काहींनी थेट आत्महत्या करण्याच्या धमक्याही दिल्या आहे. या उत्तरपत्रिका पाहून तपासणी करणारे शिक्षक देखील चक्रावले आहेत. मात्र त्यांना नियमाप्रमाणेच अर्थात सोडवलेल्या पेपर प्रमाणे मार्क दिले जाणार असल्याचे नाशिक विभाग बोर्डाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी सांगितले.
निकाल शासनाकडे: दहावीसाठी नाशिक जिल्ह्यातील 91 हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर बारावीसाठी जिल्ह्यातून 74 हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पेपर संपल्यापासून दोन्ही वर्गाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू होते. मधल्या काळात शिक्षक संघटनांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून नंतर त्यांनी बहिष्कार मागे घेऊन अतिरिक्त वेळ देत उत्तर पत्रिका तपासल्या आहेत. सद्यस्थितीत नाशिक विभागातील दहावी आणि बारावीच्या सर्व उत्तरपत्रिका तपासल्या असून निकाल तयार आहे. हा निकाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे, असे नाशिक बोर्डाने सांगितले आहे.
हस्ताक्षर बदली सुपरवायझर वर कारवाई: एकाच उत्तरपत्रिकेवर एकापेक्षा जास्त व्यक्तींचे हस्तक्षर असल्याचे आढळून आले आहे. दहावी व बारावी मिळून अशा एकूण 36 उत्तरपत्रिका आढळल्या आहेत. या सर्व उत्तरपत्रिका वेगळ्या काढण्यात आल्या आहेत. संबंधित विद्यार्थ्यांच्या वर्गावर असलेल्या सुपरवायझर विरोधात कठोर कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र नाशिक बोर्डाने शाळांना पाठवले आहे.
विद्यार्थी या करतात चुका:पेपर लिहिताना काही विद्यार्थी अनेकचुका करतात. यामध्ये ते स्वतःची ओळख दाखवतात, उत्तर पत्रिकेवर स्वतःचा नंबर लिहितात. तसेच देवी देवतांचे नाव लिहितात, तसेच काही विद्यार्थी हे मी गरीब आहे, मला पास करा किंवा मला पास केलं नाही तर मी आत्महत्या करेन. अशा प्रकारच्या धमक्या देतात. कॉपी करता, पेपर फाडतात अशावेळी आम्ही त्या विद्यार्थ्यांची त्या विषयाची संपादणूक रद्द करत असतो, असे नाशिक बोर्डाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी सांगितले.
हेही वाचा -
- HSC Exam उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल बोर्डाने पाठवली नोटीस
- HSC result 2023 बारावीचा निकाल ३१ मे रोजी लागण्याची शक्यताशरद गोसावी
- CISCE Result 2023 ICSE परीक्षेत पुन्हा मुलींनी मारली बाजी असा चेक करा निकाल