येवला - शहरात रमजान ईद साधेपणाने साजरी करण्यात आली असून मुस्लिम धर्मगुरूंनी केलेल्या आव्हानला प्रतिसाद देत कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनचे नियमाचे पालन करत येवल्यातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरातच अदा केली.
घरातच नमाज पठण -
येवल्यातील ईदगहा मैदानावर ईद निमित्त सामूहिक नमाज पठण केले जात असते मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे ईदची नमाज घरातच अदा करण्यात आली. यावेळी ईदगहा मैदान परिसरात शुकशुकाट बघण्यास मिळाला आहे. मुस्लिम धर्मगुरूंनी केलेल्या आव्हानला प्रतिसाद देत कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनचे नियमाचे पालन केले. येवल्यातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची नमाज ही घरातच अदा करत सामाजिक अंतर ठेवत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.