महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : ऑनलाईन वस्तू खरेदीच्या बहाण्याने दुकानदारांची फसवणूक, 3 लाखांचा गंडा

चोरट्यांनी थेट दुकानदारांना खरेदीच्या बहाण्याने गंडा घालण्यास सुरवात केली आहे. दुकानदारांच्या फोनवर संपर्क करून, आम्हाला आपल्या दुकानातून वस्तू खरेदी करायच्या आहेत, असे अगोदर सांगितले जाते. त्यानंतर वस्तूंचे बिल हे ऑनलाईन करतो, असे सांगून क्यू.आर कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते. आणि दुकानदाराने कोड स्कॅन केल्यास थेट त्याच्या अकाऊंटवरून रक्कम काढून घेतली जाते.

ऑनलाईन गंडा
ऑनलाईन गंडा

By

Published : Aug 12, 2020, 7:04 PM IST

नाशिक- ऑनलाईन वस्तू खरेदीच्या बहाण्याने शहरातील दुकानदारांना तब्बल ३ लाख ३७ हजार रुपयांनी गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. घटनेत ऑनलाईन पद्धतीने १८ दुकानदारांकडून सदर रक्कम उकळण्यात आली आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे

अशी होते चोरी...

चोरट्यांनी थेट दुकानदारांना खरेदीच्या बहाण्याने गंडा घालण्यास सुरवात केली आहे. दुकानदारांच्या फोनवर संपर्क करून, आम्हाला आपल्या दुकानातून वस्तू खरेदी करायच्या आहेत, असे अगोदर सांगितले जाते. त्यानंतर वस्तूंचे बिल हे ऑनलाईन करतो, असे सांगून क्यू.आर कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते. आणि दुकानदाराने कोड स्कॅन केल्यास थेट त्याच्या अकाऊंटवरून रक्कम काढून घेतली जाते. आतापर्यंत नाशिकमधील १८ दुकानदारांच्या खात्यातून अशा प्रकार रक्कम काढली गेली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानदारांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या अगोदर अनेक वेळा नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. तरीही नागरिक बेसावधरित्या आशा बनावट कॉल्सवर विश्वास ठेवून आपला ओटीपी सांगतात किंवा समोरच्या अज्ञात व्यक्तीने पाठवलेला क्यू.आर कोड स्कॅन करतात. त्यामुळे, अशी फसवणूक होते. हे बघता नागरिकांनी बनावट कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. यामुळे, यापुढे जर आपणही ऑनलाईन खरेदी किंवा पेमेंट करत असाल, तर सतर्क राहा आणि फेक कॉल्सना बळी पडून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या.

हेही वाचा-कोरोना इफेक्ट : घरोघरी जाऊन करणार गणेशमूर्ती संकलन; नाशिक मनपाचा उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details