नाशिक -मालेगाव शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने आपल्या भागातील विकासकामाच्या उदघाटनाप्रसंगी चक्क आपल्या जवळील बंदुकीतून हवेत गोळी झाडत आनंदोत्सव साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
वार्ड क्र.13 मधील धक्कादायक प्रकार -
मालेगाव मनपाच्या वार्ड क्र. 13मध्ये गेल्या ३० वर्षांपासून गटार आणि रस्त्याचे काम झाले नव्हते. मात्र, दोन दिवसांपुर्वी येथे विद्यमान नगरसेवक जफर अहेमद यांनी विकास कामांचा शुभारंभ या परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत केला. तेव्हा एका व्यक्तीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार करत आनंद व्यक्त केला.