महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shocking : पत्नीची गळा चिरून हत्या, पती अटकेत - Wife strangled to death

पत्नीचा गळा चिरून ( Wife strangled to death) पती फरार झाल्याचा धक्कादायक (Shocking) प्रकार नाशिकच्या अंबड शिवारातील चुंचाळे येथे उघडकीस आला आहे. संगीता सचिन पवार( वय 25) असे या खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. फरार पती हा औरंगाबाद वाळुज पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाला. अंबडच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले (husband arrested) आहे

Murder of wife
पत्नीची हत्या

By

Published : Jun 27, 2022, 7:45 PM IST

नाशिक:अंबड चुंचाळे शिवारात सचिन अशोक पवार मूळ राहणार खिर्डी ता.खुलताबाद औरंगाबाद हा पत्नी संगीता सोबत चार दिवसांपूर्वी रहायला आला होता. रात्री दोघा दांपत्यांमध्ये वाद झाले, या वादातून संशयित पतीने पत्नीचा गळा चिरून तिचा खून केला (Wife strangled to death) . त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून तो फरार झाला. पहाटे औरंगाबाद येथील वाळुंज पोलिस स्टेशन मध्ये तो स्वतः हजर झाला.येथील पोलिसांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर घरात रक्ताच्या थारोळ्यात पत्नी मृत अवस्थेत दिसून आली. पोलिसांकडून मृतदेह शवविचछेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. अंबड पोलिसांच्या पथकाने संशयिताला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले (husband arrested) असून अधिक तपास सुरू आहे.चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याचा संशय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details