महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक : नाशिकमध्ये दुचाकी अडवून महिलेवर बलात्कार - Nashik Rape News

सिन्नर तालुक्यातल्या शहा परिसरात सोमवारी पीडित महिला दुचाकीवरून जात होती. पंचाळे-कोळपे रोडवरून जाताना संशियत आरोपी प्रशांत राजाराम सांगळे (रा. माळेगाव, ता. सिन्नर) याने तिचा कारने पाठलाग सुरू केला. शेवटी त्याने महिलेला गाठले आणि कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

Shocking: Rape in a car in Nashik
धक्कादायक : नाशिकमध्ये दुचाकी अडवून महिलेवर केला बलात्कार

By

Published : Sep 12, 2021, 7:24 PM IST

नाशिक - महाराष्ट्रात आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई, पुणे, अमरावती, पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील बलात्काराची घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील शहा परिसरात एका महिलेची दुचाकी अडवून तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वावी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दुचाकी अडवून कारमध्ये टाकले -

सिन्नर तालुक्यातल्या शहा परिसरात सोमवारी पीडित महिला दुचाकीवरून जात होती. पंचाळे-कोळपे रोडवरून जाताना संशियत आरोपी प्रशांत राजाराम सांगळे (रा. माळेगाव, ता. सिन्नर) याने तिचा कारने पाठलाग सुरू केला. शेवटी त्याने महिलेला गाठले. महिलेच्या दुचाकीसमोर कार लावून अडवले. त्यानंतर महिलेला बळजबरने आपल्या कारमध्ये टाकून दरवाजे बंद केले. कारमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला.

अत्याचार करून दिली धमकी -

महिलेला कारमध्ये टाकल्यानंतर प्रतिकार करत तिने आरडाओरडा केला. मात्र आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. सोबतच महिलेचे मोबाइलमध्ये फोटो काढले. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली, तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -संतापजनक... अमरावती जिल्ह्यात पुन्हा ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

ABOUT THE AUTHOR

...view details