महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Suicide News: भर रस्त्यात बंद पडली शिवशाही, प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये पाठवून चालकाने केली आत्महत्या

जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी शिवारात नादुरुस्त शिवशाही बसमध्ये चालकाने आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. राजू हिरामण ठुबे (49, रा दोनवाडे भगूर, ता. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.

Nashik ST driver Suicide News
नाशिक चालक आत्महत्या

By

Published : May 25, 2023, 2:05 PM IST

नाशिक : आत्महत्या केलेले चालक राजू ठुबे हे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार क्रमांक एकमध्ये कार्यरत होते. शिर्डी येथून नाशिककडे शिवशाही बस (क्रमांक एम एच 09 ई एम 1280) घेऊन ते जात असताना दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यात वावी सोडल्यानंतर पांगरी शिवारात बस नादुरुस्त झाली.

बसमधील प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या बसमध्ये बसवून दिल्यानंतर ठुबे यांनी सिन्नर आगारात निरोप देऊन दुरुस्ती पथक पाठवण्याची विनंती केली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत सिन्नर येथील दुरुस्ती पथक आले नाही. दुरुस्तीला पथक आलेने नसल्याने त्यांच्यासोबत असलेली महिला चालकदेखील घरी निघून गेली. रस्त्यात बिघडलेल्या बसमध्ये चालक ठुबे एकटेच होते.

रस्त्यात बंद पडलेली शिवशाही

दुरुस्ती पथकातील कर्मचाऱ्यांना बसला धक्का-रात्री सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास सिन्नर येथील दुरुस्ती पथक बिघडलेल्या बस जवळ आले. यावेळी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी ठुबे यांना आवाज दिला. परंतु कुठलाही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी बसमध्ये प्रवेश केला. यावेळी अंधार असल्याने मोबाईल टॉर्च लावून बसमध्ये बघण्यास सुरुवात केली. तेव्हा पाठीमागे शेवटच्या सीटजवळ चालक ठुबे यांचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट-बसच्या छताकडील एअर विंडोच्या हुकला अडकलेला त्यांचा मृतदेह कर्मचाऱ्यांनी पाहिला. यानंतर बस दुरुस्ती पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ सिन्नर आगारात याबाबत माहिती दिली. तसेच चालकाच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. रात्री दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एका खासगी रुग्णवाहिकेतून बस चालक ठुबे यांचा मृतदेह सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बस चालक राजू ठुबे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा-

  1. Thane crime : 25 चोरीचे गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार फिल्मी स्टाईलने लॉकअपमधून पसार
  2. Mumbai Suicide : धारावीतील एका हॉटेलमध्ये ३४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
  3. Thane Crime: इराणी कबिल्यातील सुंदरी निघाली ड्रग डीलर; एमडी ड्रग्जसह चरस हस्तगत

ABOUT THE AUTHOR

...view details