महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शर्जील उस्मानी ही घाण उत्तरप्रदेशातून आली, योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावे' - bigoted Sharjeel Usmani news

'एल्गार सभेनंतर राज्यात वातावरण बिघडत आहे. त्यामुळे यापुढे अशा सभांना परवानगी देण्यासाठी सरकारला विचार करावा लागेल,' असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. शिवाय, 'एल्गार'वाल्यांची मानसिकता तपासावी लागेल. शर्जील उस्मानी ही घाण उत्तरप्रदेशातून आली आहे. योगी सरकारने आमच्या पोलिसांना शर्जील उस्मानीला अटक करण्यासाठी सहकार्य करावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शर्जील उस्मानी ही घाण उत्तरप्रदेशातून आली
शर्जील उस्मानी ही घाण उत्तरप्रदेशातून आली

By

Published : Feb 6, 2021, 7:27 PM IST

नाशिक - 'हिंदूंबाबत अपशब्द काढणारे शर्जील उस्मानी ही घाण उत्तरप्रदेशातून आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने उस्मानीला अटक करण्यासाठी आमच्या पोलिसांना सहकार्य करावे,' असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिकला आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

'शर्जील उस्मानी ही घाण उत्तरप्रदेशातून आली, योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावे'
तीन दिवसांपूर्वी पुण्याच्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याने हिंदू धर्मीयांविषयी अपशब्द वापरले होते. यानंतर राज्य सरकारने ह्याची गांभीर्याने दखल घेत उस्मानी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता उस्मानीला अटक करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमच्या पोलिसांनी सहकार्य करावे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -सामनातून नाना पटोलेंवर टीका केली नसून त्यांच्या क्षमतेचे कौतुक, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

'एल्गार'वाल्यांची मानसिकता तपासावी लागेल

'एल्गार सभेनंतर राज्यात वातावरण बिघडत आहे. त्यामुळे यापुढे अशा सभांना परवानगी देण्यासाठी सरकारला विचार करावा लागेल,' असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. शिवाय, 'एल्गार'वाल्यांची मानसिकता तपासावी लागेल. शर्जील उस्मानी ही घाण उत्तरप्रदेशातून आली आहे. योगी सरकारने आमच्या पोलिसांना शर्जील उस्मानीला अटक करण्यासाठी सहकार्य करावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यपाल घटनाबाह्य वागतात

12 आमदार नियुक्ती राजकीय नाही, सरकारने केलेल्या शिफारसी राज्यपालांना स्वीकारणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत. केंद्राने राज्यपालांना परत बोलवावे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

हेही वाचा -शिवसेनेचा भाजपसह मनसेला 'दे धक्का'; दोन नेत्यांनी बांधले शिवबंधन

ABOUT THE AUTHOR

...view details