महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात आता 'महाशिवआघाडी'च सरकार येणार - मोहन प्रकाश - नाशिक बातमी

शिवसेना, भाजप सोबत गेली नाही. त्यामुळे राज्याला सरकार द्यायला पाहिजे म्हणून आम्ही एकत्र येत सरकार स्थापन करणार, असे मोहन प्रकाश यांनी सांगितले.

मोहन प्रकाश

By

Published : Nov 14, 2019, 8:56 PM IST

नाशिक- 'शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच सरकार आलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महाराष्ट्राचे विभाजन होऊ नये, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय या मुद्द्यांवर एकत्र येत बनेल, असा विश्वास काँग्रेसचे माजी सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी व्यक्त केला.

मोहन प्रकाश

हेही वाचा-लग्नाचा पहिला वाढदिवस : रणवीर दीपिका पोहोचले तिरुपती दर्शनाला

मोहन प्रकाश हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष देशातील जनतेला विश्वासात घ्यायला तयार नाही. आपल्या मित्रपक्षांना पण विश्वासात घ्यायला तयार नाही. आमची भूमिका विरोधात बसण्याची होती. मात्र, भाजपने शिवसेनेला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे शिवसेना, भाजप सोबत गेली नाही. त्यामुळे राज्याला सरकार द्यायला पाहिजे म्हणून आम्ही एकत्र येत असल्याचे मोहन प्रकाश यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details