महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात शिवसेना नेत्याने घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची भेट; उलट-सुलट चर्चेला उधाण

विधानसभा निवडणूक  प्रचाराची धामधूम सुरू असतानाच संजय राऊत यांनी नाशिक पूर्व मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

By

Published : Oct 11, 2019, 4:24 PM IST

Updated : Oct 11, 2019, 4:59 PM IST

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस

नाशिक -विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असतानाच संजय राऊत यांनी नाशिक पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले, आमचा लढा फडणविसांविरोधातच'

बाळासाहेब सानप हे पूर्व मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते. मात्र, या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्याचा निर्णय घेतला. तर त्यांच्या विरोधात पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असलेले राहुल ढिकले यांचा पक्षात प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली आहे.

नाशकात शिवसेना नेत्याने घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची भेट

त्यामुळे बाळासाहेब सानप यांचा गट भाजपवर नाराज झाला आहे. त्यातच शुक्रवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बाळासाहेब सानप यांची त्यांच्या कार्यालयात येऊन भेट घेतली. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, सानप यांची भेट ही सदिच्छा भेट होती. बाळासाहेब सानप हे संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली आहे. मात्र, राजकीय कोणतीही चर्चा झाली नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - भारत-चीन दुसरी अनौपचारिक शिखर परिषद : ममल्लापूरममध्ये जिनपिंगच्या स्वागताची जय्यत तयारी!

Last Updated : Oct 11, 2019, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details