नाशिक- आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्साह पाहावयास मिळत आहे. रात्रीपासून अनेक शहरांमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तरुण-तरुणींनी एकत्र येत जल्लोष केला. मालेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री महाराजांच्या पुतळ्यासमोर भगवे ध्वज फडकावून अभिवादन केले.
मालेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात सुरू - मालेगाव शहरात शिवजयंती
मालेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री महाराजांच्या पुतळ्यासमोर भगवे ध्वज फडकावून अभिवादन केले. शहरात आज भव्य अशी मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार आहे.
मालेगाव शहरात शिवजयंती
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते भगवे ध्वज फडकावून पुतळ्याला वंदन करत जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत 'जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा' देत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मालेगाव शहरात आज भव्य अशी मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार आहे. मात्र, शिवप्रेमींनी शहरातील रस्ते व्यवस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.