नाशिक- बंडखोर आमदार सुहास कांदे ( Rebel MLA Suhas Kande ) यांची उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) टीकाशस्त्र सोडले आहे. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंनी ( Shiv Sena youth leader Aditya Thackeray ) माझे प्रश्नाचे उत्तर दिली, तर मी तातडीने राजीनामा द्यायला तयार आहे. आणि पुन्हा निवडणुकीसाठी ( election ) तयार आहे, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी यावेळी म्हटले आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना नक्षलवाद्यांची धमकी आली असताना सुद्धा त्यांना सुरक्षा न देण्यासाठी वर्षा'वरुन फोन केला गेला, असे म्हणत त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका -एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून 40 आमदार यांनी बंडखोरी करत शिवसेनेतून ते बाहेर पडले. मात्र, आत्ता त्यातील कोणीही ठाकरे कुटुंबीयांवर थेट टीका केली नव्हती. मात्र, आता नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी मतदारसंघात माझं काही चुकलं, अशा प्रकारचे बॅनर लावले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांची धमकी आली असताना सुद्धा त्यांना सुरक्षा न देण्यासाठी वर्षा'वरुन फोन केला गेला असे म्हणत त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माझ्या प्रश्नाची आदित्य ठाकरे यांनी उत्तरे द्या, मी तातडीने राजीनामा देतो आणि पुन्हा निवडणुकीसाठी समोर जातो असे म्हणत त्यांनी ठाकरे कुटुंबाला आव्हान दिले आहे.
हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला -शिवसेना हिंदुत्व या विषयावरून कशी लांब गेली, तसेच पालघर साधू हत्याकांड, सावरकरांच्या बाबतची भूमिका असे प्रश्न कांदे आपल्या निवेदनातून ते आदित्य ठाकरे यांना देणार आहे. उपस्थित करणार, ज्या भुजबळाने बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला, त्यांच्या मांडीला- मांडी लावून बसने चुकीचं असल्याचे त्यांनी म्हटल आहे.