महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना आमदार सुहास कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा; निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप - जिल्हा नियोजन समिती नाशिक

नादगाव मतदार संघाचे आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठवले पत्र पाठवत लेटर बाॅम्ब फोडला आहे. निधी वाटपात दुजाभाव होत असून ही न्यायप्रविष्ठ बाब आहे. बैठकीत निधी वर्ग करण्याचा विषय घेतल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांत तक्रारही दाखल करणार आहे.

शिवसेना आमदार सुहास कांदे
शिवसेना आमदार सुहास कांदे

By

Published : Oct 30, 2021, 12:00 PM IST

नाशिक - शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा नियोजन समिती निधी वाद न्यायप्रविष्ठ असल्याने ' डीपीसी ' च्या बैठकीत कामांना मंजुरी व निधी वर्ग करू नये, असे झाल्यास 'जिल्हा नियोजन समिती' च्या बैठकीमध्येच आत्मदहन करण्याचा इशारा दिला अ‍ाहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र दिल

पालकमंत्री भुजबळ व जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष -

नादगाव मतदार संघाचे आमदार कांदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवत लेटर बाॅम्ब फोडला आहे. निधी वाटपात दुजाभाव होत असून ही न्यायप्रविष्ठ बाब आहे. बैठकीत निधी वर्ग करण्याचा विषय घेतल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांत तक्रारही दाखल करणार आहे. या लेटर बॉम्बमुळे नियोजन समितीची प्रस्तावित बैठक रखडण्याची शक्यता आहे. या लेटर बॉम्ब प्रकारावर पालकमंत्री भुजबळ व जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

माझ्याकडून या वादाला पूर्णविराम - पालकमंत्री छगन भुजबळ

शिवसेना विरूद्ध छगन भुजबळ असा कुठलाही वाद नाहीच. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना वाद मिटला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राहीला नाही. तो राग इतरांनी का मनात ठेवावा. इतरांनी देखील आपल्या मनात राग ठेऊ नये. माझी कुणाविरूद्धही तक्रार नसून माझ्या कडून या वादाला मी पूर्णविराम देऊ इच्छितो आहे, आमचे मुख्य न्यायाधीश हे मुख्यमंत्री असून ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details