महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या पुण्याईमुळेच छगन भुजबळ राजकारणात टीकून आहेत - संजय राऊत - छगन भुजबळ

आपण भुजबळ यांना सांगू नांदगावचा नाद सोडा, या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नांदगाव मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क, असे सांगितले आहे. छगन भुजबळ राजकारणामध्ये टिकून आहेत ते फक्त शिवसेनेच्या पुण्याईमुळेच भुजबळ राजकारणात टीकून आहे, नाही तर भुजबळांचा राजकारण कधीच संपत असतं, असेही राऊत म्हणाले.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Oct 24, 2021, 8:44 PM IST

Updated : Oct 24, 2021, 8:55 PM IST

नाशिक -आमदार सुहास कांदे यांनी अतिशय तळमळीने विषय मांडले. त्यांना त्यांच्या मतदारसंघाबाबत किती आत्मीयत‍ा आहे ते कळते. कांदे पाहुणचार चांगले करतात. एकदा भुजबळ यांना बोलवा. पाहुणचार करुन पाहू, असा चिमटा काढत आता भगवा खाली येणार नाही. आपण भुजबळ यांना सांगू नांदगावचा नाद सोडा, या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नांदगाव मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क, असे सांगितले आहे. छगन भुजबळ राजकारणामध्ये टिकून आहेत ते फक्त शिवसेनेच्या पुण्याईमुळेच भुजबळ राजकारणात टीकून आहे, नाही तर भुजबळांचा राजकारण कधीच संपत असतं, असेही राऊत म्हणाले.

संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देतांना छगन भुजबळ

'नाशिकला लाल दिवा आहे, उद्या हा लाल दिवा नांदगावला मिळेल'

नांदगाव येथे शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले, की नांदगाव आणि परिसराचा पाणी प्रश्न हा मिटावा म्हणून आम्ही प्रयत्न करू, कारण या भागाचा पाणी प्रश्न हा मिटविणे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण या ठिकाणी शिवसेनेचा भगवा हा फडकत आहे. शिवसेनेचा भगवा हा जनतेचे प्रश्न संपवण्यासाठी असतो. आज नाशिकला लाल दिवा आहे. उद्या हा लाल दिवा नांदगावला मिळेल. पण या माध्यमातून छगन भुजबळ यांनी आपले राजकारण शिवसेनेची पुण्याई असल्याने त्यावर सुरू असल्याचे लक्षात ठेवावे, असा टोला राऊत यांनी भुजबळाना लगावला आहे.

'शिवसेनेच्या पुण्याईने छगन भुजबळ राजकारणात टीकून आहेत'

भगवा झेंडा नांदगाव वरती फडकत आहे. ते तेज कमी होणार नाही अस काम करा. महाविकास आघाडी सरकार झाले नसते तर ते मंत्री झाले असते का? असा टोलाही राऊत यांनी लगावला. तुम्ही शिवसेनेत होता म्हणून तुम्ही राजकारणात टिकला. शिवसेनेच्या पुण्याईने छगन भुजबळ राजकारणात टीकून आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा -...म्हणून राज्य सरकारने सुमोटो कारवाई करावी - संजय राऊत

Last Updated : Oct 24, 2021, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details