नाशिक -जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला, असून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपला झटका बसला आहे.
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, जिल्हा परिषद अध्यक्षपद शिवसेनेकडे - Nashik Latest News
नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. महा विकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भाजपला झटका बसला आहे.
राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र येऊन महा विकास आघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे सरकार ही सत्तारूढ झाले आहेत. हाच पॅटर्न आज जिल्हा परिषदेतही राबवण्यात आला, ज्या पक्षाची जास्त सदस्य संख्या त्यांना अध्यक्षपद तर दुसऱ्या क्रमांकाची सदस्य संख्या असलेल्या पक्षाला उपाध्यक्षपद देण्याचा फार्म्युला वरिष्ठ पातळीवर ठरवण्यात आला, त्यामुळे शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांचे नाव अध्यक्षपदी निश्चित करण्यात आले होते, उप अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसची डॉ. सयाजी गायकवाड यांच्या नावाला वरिष्ठांनी पसंती दर्शवली, आवश्यक संख्याबळ नसल्याने अध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार डी. जी. हिरे आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार कंनू गायकवाड यांनी दाखल केलेले अर्ज मागे घेतल्याने, शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर आणि उपअध्यक्षपदी डॉ सयाजी गायकवाड हे बिनविरोध निवडून आले. आघाडी असल्याने काँग्रेसलाही सामावून घेण्यात आले असून एक समितीपद या पक्षाला देण्याचे ठरले आहे. निवडी नंतर विजयी उमेदवारांचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे, समीर भुजबळ यांच्या सह शिवसेन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.