नाशिक :केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात वाद सुरू झाला आहे. यात शनिवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर येऊन कार्यकर्त्यांची संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून टीका करण्यात आली. यावर बोलताना राऊत म्हणाले की, 'टोकाची चाटूगिरी सूरू असून ते आम्हाला ज्ञान देत आहेत. अमित शाह यांना जर हे माहिती नसेल, तर शाहांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. हिडेनबर्ग रिपोर्ट, किम जॉर्ज रिपोर्ट आला आहे. ईव्हीएम 2014 पासुन हॅक करण्यात आले आहे. एका इस्त्राईल कंपनीला यांनी काँट्रॅक्ट दिले आहे. यांनी हिडेनबर्ग वरील देखील उत्तर दिले नाही.
सत्ताधारी पक्षावर गंभीर :शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हकेंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसैनिक तसेच संजय राऊत निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालावर आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सर्वच नेते सध्या आक्रमक झाले आहेत. ते केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यावर सडकून टीका करत आहेत. खासदार संजय राऊत यांनी रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले. मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवजयंतीसह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.
बिल्डर मित्रांकडून पैशांची मदत :उपस्थित पत्रकारांनी निवडणूक आयोगावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, 'माझ्याकडे पक्की माहिती आहे. नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख देण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आमदार खरेदीसाठी 50 कोटी तर खासदारांच्या खरेदीसाठी 100 कोटी रूपये देत आहेत. तसेच त्यांनी निवडणुक आयोगाकडून नाव तसेच शिवसेना चिन्ह विकत घेतले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. हा निकाल विकत घेण्यात आलेला आहे, कायद्यानुरूप न्याय देण्यात आलेला नाही. अशी मला खात्रीशीर माहिती आहे. हा निकाल विकत घेण्यासाठी या 2 हजार कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे देखील राऊत म्हणाले. आता हे मुंबई महाराष्ट्र देखील विकत घेतील, अशी टीका देखील राऊतांनी केली.