नाशिक: येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या वाहानांवरचे हल्ले थांबले नाहीत, तर वेगळे परिणाम होतील. त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. यावर आता सर्वच स्थरातून प्रतिक्रिया उमटत आहे. शरद पवार हे जेष्ठ नेते असून त्यांनी दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. तसेच केंद्रातील देखील मंत्रीपद त्यांच्याकडे होते, असे असतांना त्यांनी 48 तासात सीमा प्रश्न सोडवावा, हे अल्टीमेटम देणे चुकीचे आहे.
Aniket Deshpande Allegation: शरद पवारांकडून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळविण्याचा प्रयत्न - अनिकेत देशपांडेंचा आरोप - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे महंत अनिकेत देशपांडे यांनी म्हटले आहे. अनेक भाविक हे गांगणापूरला जात असतात. त्यांना काही झालं तर, याची सर्वस्व जबाबदारी हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांवर असेल असे महंत देशपांडे यांनी म्हटले.
सीमावाद चिघळवण्याचा प्रयत्न: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार NCP leader Sharad Pawar यांची राजकीय कार्यकीर्द मोठी असून 40 वर्षात त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. आज दत्त जयंती असून आज महाराष्ट्रातून अनेक भाविक हे गांगणापूरला जात असतात. आणि त्यांना काही झालं तर, याची सर्वस्व जबाबदारी हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची असेल, असे वक्तव्य महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हटले होते शरद पवार:महाराष्ट्राने संयम पाळला आहे. मात्र त्यालाही मर्यादा आहेत. येत्या 24 तासात हल्ले थांबले नाहीत, तर आमचाही संयम सुटू शकतो, असा खणखणीत इशाराही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कर्नाटकला दिला. तसेच बोम्मईंच्या वक्तव्यामुळे सीमा भागातील परिस्थिती गंभीर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्राने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे स्पष्ट मतही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मांडले. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याला केंद्र सरकार जबाबदार असेल असेही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार NCP leader Sharad Pawar म्हणाले होते.