नाशिक -अवकाळी पावसामुळे तिळाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने किरकोळ बाजारात तिळाचे ( Sesame Rate Increased In The Market ) भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 180 रुपये किलो दराने मिळणारे तीळ आता 240 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. अशात मकर संक्रांतीचा सण ( Makar Sankranti Festival ) जवळ येत असल्याने तिळाच्या दरात अजूनही 5 ते 7 रुपये वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये गुजरातमधून सर्वाधिक तिळाची आवक होते. मात्र सध्या तिथेच मालाची कमतरता असल्याने तिळाच्या दरावर ( Heavy Rain Affected Sesame Rate ) परिणाम झाले आहेत. आणखी दर वाढण्यापूर्वीच या वस्तूंची खरेदी करणे ग्राहकांच्या हिताचे असल्यामुळे तीळ खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तिळाकडे पाठनाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी, पेठ, सुरगाणा या आदिवासी भागात एकेकाळी तिळाची चांगली लागवड होत होती. पण या भागातील शेतकरी नगदी पिकाकडे वाळल्याने तिळाच्या उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी इतर शहर, राज्यातून तीळ मागवावा लागतो. त्यामुळे साहजिक वाहतूक खर्च वाढत असल्याने तिळाच्या दरात वाढ होत आहे.
या भागातून येतो तिळनाशिकमध्ये काही प्रमाणात मध्य प्रदेशातून तर जास्त प्रमाणात गुजरातमधून तिळाची आवक होते. यावर्षी अवकाळी पावसाळ्यामुळे तीळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तिळाचे भाव 140 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचलेत.