महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shiv Samvad Yatra : आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा नसून श्रद्धांजली यात्रा - दिलीप सोळसे - Dilip Solase

आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांची शिवसंवाद यात्रा ( Shiv Samvad Yatra ) नसून श्रद्धांजली यात्रा असल्याचे मत जेष्ठ शिवसैनिक माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे ( Dilip Solase ) यांनी व्यक्त केले.

Aditya Thackeray's Shivsamvad Yatra
आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा

By

Published : Jul 22, 2022, 3:57 PM IST

मनमाड -युवासेना प्रमुख माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांची शिवसंवाद यात्रा ( Shiv Samvad Yatra ) नसून श्रद्धांजली यात्रा असल्याचे मत जेष्ठ शिवसैनिक माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे ( Dilip Solase ) यांनी व्यक्त केले. या दौऱ्याचा निश्चित फायदा होईल असेही शिवसैनिकानी सांगितले आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर आली असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहे. आज ते नांदगाव तालुक्यात येणार आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा असल्याने मनमाडमध्येकडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा

हेही वाचा -Mission 200 Incomplete : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मुख्यमंत्र्यांचे मिशन 200 अपूर्ण, चंद्रकांत पाटलांचाही दावा ठरला फोल

दरम्यान,युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांची शिवसंवाद यात्रा भिवंडी ( Shiv Samvad Yatra ) येथून सुरुवात झाली होती. शिवसंवाद यात्रा सुरुवात होण्यापूर्वी ठाणे नगरीत आदित्य ठाकरे यांचे शिवसेनेकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे भिवंडीच्या दिशेने जात असताना रस्त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घर लागते. या घराबाहेर थांबलेल्या शिवसैनिकांना भेट देत आदित्य ठाकरे भिवंडीच्या दिशेने रवाना झाले होते. निष्ठा यात्रेला आदित्य ठाकरे यांनी ठाणे शहर वगळले असून या निष्ठा यात्रेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray fleet of cars ) थांबले. यावेळी त्यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले होते.

हेही वाचा -First Transgender Corporator In Kolhapur: राज्यात प्रथमच! हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक

ABOUT THE AUTHOR

...view details