महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित - national crime bureau report

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे तयार करावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

senior citizen (file photo)
ज्येष्ठ नागरिक (संग्रहित)

By

Published : Oct 6, 2020, 3:31 PM IST

Updated : Oct 6, 2020, 5:00 PM IST

नाशिक -राज्यातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून ही बाब समोर आली आहे. राज्यात 2019 या वर्षात ज्येष्ठ नागरिकांवर तब्बल 6 हजार 163 अत्याचाऱ्यांचा घटना झाल्याचे गुन्हे नोंद झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

या परिस्थितीबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधी यांनी नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

देशभरात ज्येष्ठांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहे. यात सर्वधिक गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. यावरुन महराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे आयुष्याच्या शेवटाकडे झुकलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही अत्याचाराला समोर जावे लागत आहे.

नाशिक शहराचा विचार केला तर या शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत आहेत या गुन्हेगारांकडून ज्येष्ठ महिलांना लक्ष केले जात आहे. पहाटे आणि सायंकाळी वॉक करण्यात बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे सायंकाळी आणि सकाळच्या सुमारास पोलिसांनी रस्त्यावरील गस्त वाढवावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मात्र, यासोबतच दुसरीकडे घरातही प्रॉपर्टीच्या वादामुळे वृद्ध व्यक्तींना मानसिक तसेच शारिरीक अन्यायाला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे. घरगुती वाद असल्यामुळे यातील अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंही येत नाही, अशी परिस्थिती आहे. अशात ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या अन्याया बाबत शासनाने कठोर कायदे करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

एनसीआरबीने 2019 काळात घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात इतर राज्याच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. संपूर्ण देशात ज्येष्ठांवर अत्याचाराचे एकूण 27 हजार 596 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 6 हजार 163 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश 4 हजार 184, गुजरात 4 हजार 88 आणि तामिळनाडूमध्ये 2 हजार 509 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

  • 2019मध्ये महाराष्ट्रात वृद्ध व्यक्तींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना -
  1. 158 वृद्धांची हत्या
  2. 325 जबरी चोऱ्यांच्या घटना
  3. 43 विनयभंग
  4. 2 ज्येष्ठ महिलांवर बलात्कार
  5. 10 दरोडे
  6. 2 हजार 51 वृद्धांना लक्ष करून चोऱ्या (उदा. गळ्यातील दागिने चोरणे)
Last Updated : Oct 6, 2020, 5:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details