महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिक पोलीसही सज्ज - नाशिक पोलीस सुरक्षा तयारी

नवीन वर्षाचे स्वागत करताना शहरात काही अनुचित प्रकार घडू यासाठी नाशिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सर्वांनी काळजीपूर्वक नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिककरांना केले आहे.

विश्वास नांगरे पाटील
विश्वास नांगरे पाटील

By

Published : Dec 29, 2019, 4:42 PM IST

नाशिक -नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई अतिउत्साही असते. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटी जय्यत तयारी केली जाते. या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीसही सज्ज झाले आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक पोलीस सज्ज


३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दोन दिवस शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. यावेळी शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत कोणी दोषी आढळल्यास कलम ११०,११७,१३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील.

हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोला अपघात; 3 ठार 1 गंभीर जखमी

सर्वांनी काळजीपूर्वक नववर्षाचे स्वागत करावे. सेलिब्रेशन करताना इतरांना त्रास होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details