नाशिकमध्ये मुदतबाह्य २०० रिक्षांवर बुलडोझर, चालकांना स्वतः सहभागी होत करून घेतली कारवाई - नाशिक
गुन्हेगारी रोखण्यासाठी रिक्षा मालकाने बिल्ला ओळखपत्र असलेल्या व्यक्तीलाच रिक्षाचालक म्हणून नेमण्यात यावे, अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास चालकावर व मालकावर कारवाई करण्यात येईल, असे शहर वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.
नाशिकमध्ये मुदतबाह्य २०० रिक्षांवर बुलडोझर, चालकांना स्वतः सहभागी होत करून घेतली कारवाई
नाशिक- शहरातील एक ते चार वाहतूक शाखेच्या युनिट मध्ये करण्यात आलेल्या विशेष कारवाई अंतर्गत २०० रिक्षांवर सोमवारी स्क्रॅप कारवाई करण्यात आली आहे. स्क्रॅप कारवाई सुरू असताना अनेक चालकांनी स्वतःहून रिक्षा पोलीस मुख्यालयात आणत कारवाई करून घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वी स्क्रॅप कारवाई बाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर एकूण पन्नास रिक्षा चालकांकडुन पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आल्या होत्या.