महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नामांकित शाळांचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे राखीव 226 कोटींचे अनुदान रोखले, सरकार म्हणतं कोरोना काळात काय शिक्षण दिलं? - निधीची प्रतीक्षा

School Grant Issue By Tribal Division : कोरोना काळात आदिवासी विद्यार्थ्यांना काय शिक्षण दिले म्हणतं नामांकित शाळांचे 226 कोटींचे अनुदान आदिवासी विभागाने रोखले आहे. (Education of tribal students) मात्र, आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले असून 80 टक्के अनुदान तर द्यावे अशी मागणी नामांकित शाळा संस्थाचालकांनी केली आहे. (grant of reputed schools) परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू असताना त्याची पडताळणी कशी करणार असा प्रश्न आदिवासी विभागाला पडला आहे. या वादामुळे 50 हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. (question of education of tribal students)

School Grant Issue By Tribal Division
आदिवासी विद्यार्थी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 4:38 PM IST

नाशिकSchool Grant Issue By Tribal Division : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण मिळावे या उद्देशाने या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाकडून मोफत नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देण्याची योजना 2014 पासून राज्यात राबवली जात आहे. या विद्यार्थ्यांचा राहण्यापासून ते शैक्षणिक खर्च फी, भोजन, शालेय साहित्य आदींसाठी आदिवासी विकास विभागाकडून प्रति विद्यार्थी 50 ते 60 हजार रुपये अदा केले जातात. दरवर्षी नामांकित शाळांच्या माध्यमातून सुमारे 370 कोटी रुपये शासन आदिवासी विद्यार्थ्यांवर खर्च करत असते. 2020 ते 21 या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यात कोरोनामुळे शाळा व महाविद्यालय कधी चालू तर कधी बंद अशी अवस्था होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आलं. त्यामुळे संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणापोटी अनुदानाची मागणी करण्यात आली.

निधी देण्यास विरोध :यावेळी वित्त विभागानं जर शाळा बंद होत्या तर शाळांना अनुदान काढायचं कसं असा प्रश्न उपस्थित करत निधी देण्यास विरोध केला आहे. दरम्यान कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून शिक्षण देण्यासह शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आल्याचा मुद्दा संस्थाचालकांनी मांडला. त्यामुळे किमान 80 टक्के अनुदान मिळावे अशी मागणी शैक्षणिक संस्थांनी केली आहे. मात्र शासनाने 2020-21 मध्ये 25% रक्कम वितरित केली तर 30 टक्के निधी वितरणाचे आदेश निर्गमित केले आहेत. 2021-22 वर्षात 30 टक्के अनुदान वितरित केलेले आहे.


ऑनलाईन शिक्षण पडताळणी कशी करणार -कोरोना काळातील नामांकित शाळा सुरू असल्याचा दावा शैक्षणिक संस्थानी केला आहे. मात्र शाळा बंद असल्यानं शुल्क का द्यायचे असा प्रश्न शासनाने उपस्थित केला आहे. शैक्षणिक संस्था अनुदानासाठी आग्रही आहेत. शासनाने विद्यार्थी उपस्थितीची पडताळणी करून अनुदान वितरित करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू असताना त्याची पडताळणी कशी करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


निधीची प्रतीक्षा :वर्ष2020-21 या आर्थिक वर्षात 25% प्रमाणे 79 कोटी 55 लाख रुपये शुल्क वितरित झाले आहे. 2021-22 आर्थिक वर्षातील 30 टक्के प्रमाणे 83 कोटी 90 लाख 31 हजार 732 रुपयांचे शुल्क वितरित झाले आहेत. उर्वरित शुल्क वितरणासाठी 2020-21, 35.88 कोटी इतर 2021-22 साठी 130 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव शासनाकडे आदिवासी विभागाने दाखल केलाय. या निधीची प्रतीक्षा विभागाला आहे, अशी माहिती आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.

हेही वाचा:

  1. नागरिकांसाठी खुशखबर; 'म्हाडा'ची 11 हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध
  2. आरक्षण मिळाल्यावर आम्ही धडाकेबाज दिवाळी साजरी करू-मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांची भावना
  3. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट लावलं तर लोक जोड्यानं मारतील; 'त्या' बॅनरवरुन संजय राऊतांचं शिंदेंवर टीकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details