महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात दोन लाखांचा गुटखा जप्त; सटाणा पोलिसांची कारवाई - नाशिक सटाणा पोलीस कारवाई बातमी

मुक्तार तांबोळी (वय.३३ राहणार दत्तनगर उर्दू शाळेजवळ सटाणा) यांच्या घरी एक लाख पंचवीस हजार आठशे सात रूपये किमतीचा व सुनील दगा पवार (वय ३०.रा ठेंगोडा शीवार, खैरनार ठेगोडा ) यांच्या मळ्यात ९७ हजार ६२९ रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखू असा एकुण २ लाख २३ हजार ४२६ रुपये किमतीचा अवैध प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूच्या माल मिळून आल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली.

satana police seized rs 2 lakh gutka in nashik
नाशकात दोन लाखांचा गुटखा जप्त

By

Published : Sep 27, 2020, 8:21 PM IST

नाशिक - राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही अवैद्य मार्गाने गुटखा आणून त्यांची विक्री केली जात आहे. असाच अवैध पद्धतीने आणलेला २ लाख २३ हजार ४३६ रुपयांचा गुटखा सटाणा पोलिसांनी पकडला आहे. सटाणा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत ही कारवाई केली.

सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सटाणा पोलीस ठाणे हद्दीतील दोन ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील व कर्मचारी यांना सोबत घेऊन छापा टाकला. मुक्तार तांबोळी (वय.३३ राहणार दत्तनगर उर्दू शाळेजवळ सटाणा) यांच्या घरी एक लाख पंचवीस हजार आठशे सात रूपये किमतीचा व सुनील दगा पवार (वय ३०.रा ठेंगोडा शीवार, खैरनार ठेगोडा ) यांच्या मळ्यात ९७ हजार ६२९ रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखू असा एकुण २ लाख २३ हजार ४२६ रुपये किमतीचा अवैध प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूच्या माल मिळून आल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली.

सटाणा पोलीस ठाणे हद्दीत कुठेही अशाप्रकारे अवैद्य दारूविक्री जुगार मटका व गुटका विक्री सारखा प्रकार घडत असतील तर आमच्याशी संपर्क करावा. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आव्हान पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details