महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही.. चांगलं पारखून नेत्यांना पक्षप्रवेश - खा.संजय राऊत - आर्थिक मंदी

सध्या राज्यातील राजकारणात सध्या उत्तर महाराष्ट्र केंद्रबिंदू आहे. त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा केली. दरम्यान आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही सगळ्यांना पक्षात घायला आम्ही पारखून नेत्यांना पक्ष प्रवेश देत आहोत असं म्हणत खा. संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.

खा.संजय राऊत

By

Published : Sep 4, 2019, 10:02 PM IST

नाशिक - विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजू लागल्याने राजकीय नेत्यांना पक्षांतराचे वेध लागले आहेत. यावर खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या राज्यातील राजकारणात सध्या उत्तर महाराष्ट्र केंद्रबिंदू आहे. त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा केली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देशात कुठल्याही राज्यात एखाद्या पक्षाला यश मिळालं नसेल, इतके मोठे यश त्यावेळेस महाराष्ट्रात युतीला मिळेल असा अंदाज देखील त्यांनी यावेळी वर्तवला. दरम्यान आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही सगळ्यांना पक्षात घायला आम्ही पारखून नेत्यांना पक्ष प्रवेश देत आहोत असं म्हणत राऊत यांनी भाजपला टोला देखील लगावला.

पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत

आर्थिक मंदीवर बोलताना सध्या देशात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे, रशियासारखी परिस्थिती होऊ नये यासाठी आर्थिक मंदीवर सरकारने लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील यावेळी राऊत यांनी केली. काँग्रेस काळात देखील मोठी मंदी आली होती. मात्र, मनमोहन सिंह यांनी अत्यंत उत्तम पध्दतीने काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं अस म्हणत राऊत यांनी मनमोहन सिंग यांचे कौतुक केले.


दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटप समान होणार आहे. या संदर्भात अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं असल्याचे सूचक वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details