नाशिक- सलमान खानचा आगामी भारत सिनेमा बुधवारी रिलीज होत आहे. नाशिकमध्ये त्याचा एक जबरा फॅन आढळून आला आहे. या फॅनने सलमानचा भारत सिनेमा बघण्यासाठी संपूर्ण थेटर बुक केले आहे. या फॅनचे नाव आशिष सिंघल असे आहे.
नाशिकमध्ये सलमानचा 'जबरा' फॅन, भारत सिनेमा बघण्यासाठी सर्व थेटर केले बुक - cinema
आशिष हा सलमानचा लहानपणापासून मोठा फॅन असून, तो सलमानचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो. सलमानचा भारत मूव्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोड परिसरातील पीव्हीआर हे पूर्ण थिएटर त्याने बुक केले आहे.
आशिष हा सलमानचा लहानपणापासून मोठा फॅन असून, तो सलमानचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो. सलमानचा भारत मूव्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोड परिसरातील पीव्हीआर हे पूर्ण थिएटर त्याने बुक केले आहे. त्यामुळे आशिष सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
अतुल अग्निहोत्री ,अल्विरा अग्निहोत्री ,भूषण कुमार, कृष्णकुमार आणि सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर, अली अब्बास जफर ने सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. येत्या ५ जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.