नाशिक - मातेपासून ताटातूट झालेल्या बिबट्याचा बछडा पुन्हा मातेच्या कुशीत जाऊन वसला. दिंडाेरी वनविभाग व ईकोएको फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जेथे हा बछडा आढळला हाेता, तेथे ट्रॅप कॅमेरे लावून सुरक्षित ठेवले हाेते. त्याचवेळी बिबट्या मादी रात्रीच्या वेळी आली. तिने अंदाज घेऊन बछड्याला जबड्यात धरुन सुरक्षितस्थळी घेवून जातानाचे चित्रण कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
Leopard Cub Nashik : मोहाडीत ताटातुट झालेल्या मादी बिबट आणि पिल्लाची वनविभागाने घडवली भेट; दृश्य कॅमेरात कैद
दिंडोरी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील उमराळे परिमंडळात मोहाडी परिसरातील अण्णासाहेब जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता उसताेड मजूरांना बिबट्याचा पंधरा दिवसाचा बछडा दिसला. मजूरांनी व शेतकऱ्यांनी ही बाब तत्काळ वनविभागास कळविली. जेथे बछडा सापडला त्याच शेतात सायंकाळी यंत्रणेने ट्रॅप कॅमेरा लावला. त्यात रात्री मादी बिबट आली. तिने आजूबाजूला सुरक्षित वातावरण असल्याचे पाहून ज्या ठिकाणी बछड्या आहे, त्याच ठिकाणी धाव घेतली.
दिंडोरी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील उमराळे परिमंडळात मोहाडी परिसरातील अण्णासाहेब जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता उसताेड मजूरांना बिबट्याचा पंधरा दिवसाचा बछडा दिसला. मजूरांनी व शेतकऱ्यांनी ही बाब तत्काळ वनविभागास कळविली. त्यानंतर दिंडाेरी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ईकोएको फाउंडेशनचे सदस्य शेतात पाेहाेचले. त्यांनी सर्व माहिती व आढावा घेतला. त्याचवेळी मातेपासून विलग झालेल्या बिबट मादी व बछड्याची भेट घडवून आणण्यासाठी तयारी करण्यात आली. जेथे बछडा सापडला त्याच शेतात सायंकाळी यंत्रणेने ट्रॅप कॅमेरा लावला. त्यात रात्री मादी बिबट आली. तिने आजूबाजूला सुरक्षित वातावरण असल्याचे पाहून ज्या ठिकाणी बछड्या आहे, त्याच ठिकाणी धाव घेतली. यावेळी तिने बछड्याला अलगद जबड्यात धरुन सुरक्षिक ठिकाण गाठले.