महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Trimbakeshwar Dargah Controversy: त्र्यंबकेश्वर मंदिराजवळच्या दर्ग्यात देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा - Gods Idols in Trimbakeshwar Dargah

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ असलेल्या दर्ग्यात देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा साधू महंतांनी केला आहे. याची ज्ञानवापीप्रमाणे पाहणी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच ही जागा ज्यांची आहे, त्याच्याकडे सरकारने सुपूर्द करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Trimbakeshwar Dargah Controversy
त्र्यंबकेश्वर

By

Published : May 19, 2023, 4:40 PM IST

'त्या' दर्ग्याविषयी साधू-महंतांची प्रतिक्रिया

नाशिक (त्र्यंबकेश्वर): मंदिरात हिंदू व्यतिरिक्त इतर धर्मियांना प्रवेशबंदी असताना संदल मिरवणूक दरम्यान मंदिराला धूपआरती दाखवण्यासाठी चार ते पाच जणांनी मंदिरात बळजबरीने जाण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत 'एसआयटी' मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हा वाद शमला नसतानाच आता त्र्यंबकेश्वरमध्ये नवा वाद समोर आला आहे. तो म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिराजवळील दर्ग्यात देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा.


पुरातत्व विभागाने सर्वेक्षण करावे:त्र्यंबकेश्वर येथील दर्गा ही नाथ संप्रदायाची जागा असून, ज्ञानवापीप्रमाणे पुरातत्व विभागाने याचे सर्वेक्षण करावे. तेथील भुयारी मार्गामध्ये गणपती आणि इतर देवतांच्या मूर्ती सापडतात. त्याचप्रमाणे दर्ग्यावरती नाथ संप्रदायाची चिन्हे कोरली आहेत, असे मत इतिहास तज्ज्ञांकडून आम्हाला समजले. शासनाने जी 'एसआयटी' नेमली आहे, त्यांनी या गोष्टीची देखील चौकशी करावी. नाथ सांप्रदायमधील स्थान निघाले तर ते त्यांना सुपूर्द करावे, अशी मागणी साधू-महंतांनी केली आहे.

तर मशिदीमध्ये हनुमान चालीसा म्हणू द्या: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील गुलाबशहा दर्ग्याचे संदल प्रमुख सलीम सय्यद त्यांच्या एकात्मतेच्या संदेशावर अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत अनिकेत देशपांडे यांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे. जर तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुस्लिमांच्या प्रवेशाला भाईचारा म्हणत असाल तर आम्हाला मशिदीमध्ये हनुमान चालीसा म्हणू द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

धुपारती दाखवणे बंद: ज्योतिर्लिंग मंदिर परिसर येथून पुढे संदल दरम्यान धुपारती दाखवणे बंद करण्यात येणार असल्याचे गुलाबशहा दर्ग्याचे संदल प्रमुख सलीम सय्यद यांनी ग्रामसभेत स्पष्ट केले. तसेच वाद निर्माण न करता समाजात एकतेचे दर्शन घडवावे, पर्यटकांचा विचार करत शांतता प्रस्थापित करावी. बाहेरच्या संघटनांनी या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा:

  1. Sanjay Raut visit to Nanded : लोकसभेत जिंकलेल्या 19 जागांवर शिवसेनेचाच उमेदवार असेल -संजय राऊत
  2. Rape Of Two Minor Girls : अनाथ मुलींना दत्तक घेऊन ६ वर्षे अत्याचार, अनोळखी व्यक्तीच्या तक्रारीनंतर चाईल्डलाईनकडून सुटका
  3. Nagpur Metro Project: नागपूर मेट्रो प्रकल्पात ८७७ कोटींचा भ्रष्ट्राचार; महामेट्रोचे माजी एमडी आणि लेखापालावर कारवाई करा- प्रशांत पवार

ABOUT THE AUTHOR

...view details