नाशिक : 'सरकारचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे कृषिमंत्र्यांच्याच जिल्ह्यात शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे', अशी टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यावर केली. नाशिकमधील भाजीपाला व फळभाज्यांना काही दिवसांपासून कवडीमोल भाव मिळत असल्याने खोत यांनी गुरुवारी (26 ऑगस्ट) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी खोत यांच्यासमोर संतप्त होत टोमॅटोचा माल मार्केटच्या आवारात फेकून दिला आहे. शेतकऱ्यांनीही पडलेल्या बाजारभावावर नाराजी व्यक्त केली.
पणन खातं काय करतंय? - खोत
'ज्या टोमॅटोला एकरी दोन ते तीन लाख रुपये इतका खर्च येतो, त्या टोमॅटोला अवघा एक रुपया किलो भाव मिळत आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. कृषिमंत्री फक्त 'पिकेल ते विकेल' अशा घोषणा देतात. मात्र पुढे काहीही करत नाही. आता तराजू हातात घेऊन विका. पणन खातं काय करतंय?', असा सवालही खोत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
"किलोमागे १० रुपये अनुदान द्यावे"