नाशिक- राज्यातील काही प्रस्थापित मराठा घराण्यामुळे विस्थापित मराठ्यांना आरक्षणपासून राहावे लागत असल्याची टीका रयत शेतकरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सत्तेची चावी मूठभर राजकारणांच्या हातात राहिल्याने राज्याच्या विकासावर परिणाम झाला
शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मूठभर नेत्यांमुळे मराठा समाजातील गरीब लोकांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या विसंगतीमुळे आरक्षण न्यायालयात टिकले नाही, असा हल्लाबोल त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. मागील सरकारच्या काळात भाजपने ज्यावेळेस निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वी आम्ही कडधान्य मुक्तीचा निर्णय घेत होतो. पण, सर्व बाजार समित्यांनी त्याला विरोध केला आणि तो निर्णय होऊ शकला नाही, असे खोत म्हणाले. महाराष्ट्रात सत्तेची चावी फक्त मूठभर राजकारणांच्या हातात राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
भाजप सेनेची युती नैसर्गिक