नाशिक - शहरात 29 आणि 30 मे रोजी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. 3 जणांना जखमी करुन बिबट्याने धूम ठोकली होती. मात्र, अद्याप या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले नाही. त्यामुळे नाशिकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, अशात काही जण बिबट्या दिसल्याच्या अफवा पसरवत असल्याने वन विभाग आणि पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
बिबट्या आला रे...नाशिकमध्ये बिबट्याच्या अफवांमुळे वन विभाग, पोलीस हैराण
नाशिक शहरात 29 आणि 30 मे रोजी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने 3 जणांना जखमी केले होते. अद्याप या बिबट्याला जेरबंद करण्यात आले नसून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
नाशिकमध्ये एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण, निसर्ग चक्रीवादळामुळे जोरदार पावसाचा तडाखा आणि तिसरीकडे बिबट्याबाबतच्या अफवांमुळे पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे. 31 मे रोजी नाशिकच्या इंदिरानगर भागत बिबट्याने पहाटे मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या 2 जणांना जखमी करत धुम ठोकली होती. नागरिकांवर हल्ला करणाऱ्या त्या बिबट्याला अद्याप जेरबंद करण्यात वन विभागला यश आले नसून, या बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे काहीजण बिबट्या दिसल्याच्या अफवा पसरवत असून, वनविभाग आणि पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. काल (3 मे) मध्यरात्री द्वारका परिसरात बिबट्या दिसल्याचा फोन वन विभागाला आला होता. तब्बल चार ते पाच तास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि मुंबई नाका पोलिसांनी या परिसरात बिबट्याचा शोध घेतला. मात्र, बिबट्या आणि बिबट्याच्या पायाचे ठसे देखील दिसून आले नाहीत.
याआधी देखील शहरातील खोडे मळा, उंटवाडी, गोविंदनगर, चांडक सर्कल आदी भागात बिबट्या दिसून आल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. एकीकडे गेल्या 3 महिन्यांपासून पोलीस यंत्रणा लॉगडाऊनच्या काळातील पोलीस बंदोबस्तात व्यस्त आहे. दुसरीकडे मात्र, अशा आफवांमुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढत आहे.