महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुख्यात गुंड विकास दुबेचे नाशकात लागेबांधे? भंगार बाजारात झडतीसत्र राबवल्याच्या चर्चांना उधाण

विकास दुबेचे लागेबांधे नाशिक आणि औरंगाबादमध्ये असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील दोन पतके नाशिक आणि औरंगाबादेत दाखल झाले असल्याची जोरदार चर्चा आहे. यात नाशकात दाखल झालेल्या पथकाने नाशकातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील भंगार बाजारात झडतीसत्र राबविल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अशी कोणतीही माहिती पोलीस प्रशासनाला नसून याबाबत सातपूर पोलीस चौकशी करत असल्याचे सातपूर पोलिसांनी दिली.

gangster vikas dubey connection  gangster vikas dubey news  vikas dubey latest news  कुख्यात गुंड विकास दुबे  गँगस्टर विकास दुबे  नाशिक लेटेस्ट न्यूज
कुख्यात गुंड विकास दुबे

By

Published : Jul 9, 2020, 6:47 PM IST

नाशिक - उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड विकास दुबे याने अवैधरित्या शस्त्रे विकल्याचा तसेच सशस्त्र सुरक्षारक्षक देण्याचा ठेका घेतल्याच्या संशयावरून नाशिक शहरातील सातपूर परिसरातील भंगार बाजारात विशेष झडती सत्र राबविल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, अशी कोणतीही कारवाई झाली नसून पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याचे सातपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कुख्यात गुंड विकास दुबेचे नाशकात लागेबांधे? भंगार बाजारात झडतीसत्र राबवल्याच्या चर्चांना उधाण

एका गुन्ह्यात गुंड विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस पथक त्याच्या कानपूरमधील घरी गेले होते. पोलीस घरी आल्यावर दुबेने साथीदारांच्या मदतीने पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये आठ पोलीस ठार झाले, तर सातजण जखमी झाले. या घटनेनंतर राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर विकास दुबे फरार झाला होता. मागील आठ दिवस पोलिसांना हुलकावणी देत तो फिरत होता. हरियाणातील एका हॉटलमध्येही तो थांबला होता. मात्र, पोलीस पोहोचण्याच्या आधी त्याने पोबारा केला. त्याच्यावर 5 लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले होते. त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी चकमकीत ठार केले असून इतरांना पकडण्यात येत आहे. तसेच आज दुबेला मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाली मंदिरातून अटक केली.

दरम्यान, त्याचे लागेबांधे नाशिक आणि औरंगाबादमध्ये असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील दोन पतके नाशिक आणि औरंगाबादेत दाखल झाले असल्याची जोरदार चर्चा आहे. यात नाशकात दाखल झालेल्या पथकाने नाशकातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील भंगार बाजारात झडतीसत्र राबविल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अशी कोणतीही माहिती पोलीस प्रशासनाला नसून याबाबत सातपूर पोलीस चौकशी करत असल्याचे सातपूर पोलिसांनी दिली. मात्र, आज त्याला उज्जैनमधून अटक करण्यात आली असून त्याचे नाशिकमध्ये लागेबांधे होते की नाही? हे येत्या काळात समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या संवेदनशील प्रकरणामध्ये खोट्या अफवा न पसरवता सहकार्य करण्याचे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details