नाशिक- शहरातील पेठ रोडवरील परिसरातील राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय कार्यालयावर चोरट्यांनी डल्ला मारीत जवळपास ६८ बॉक्स विदेशी दारू लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे व या संशयितांकडून दोन बॉक्स हस्तगत करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालयावर तळीरामांचा डल्ला; ६८ बॉक्स लंपास - नाशिक बातमी
चोरट्यांनी डल्ला मारीत जवळपास ६८ बॉक्स विदेशी दारू लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे व या संशयितांकडून दोन बॉक्स हस्तगत करण्यात आले आहे.
सध्या जगभरात कोरोना विषाणुने धुमाकूळ घातला आहे. देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या संचारबंदी काळात मात्र तळीराम हे देशी विदेशी दारू दुकानावर डल्ला मारून दारूची सुविधा करत आहेत. पेठ रोडवर राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय कार्यालय आहे. या ठिकाणाहून नाशिकसह जळगाव, धुळे नंदुरबारचा कारभार चालतो. भरारी पथकामार्फत होणाऱया कारवाईत जप्त केलेला देशी विदेशी गावठी दारूचा मुद्देमाल जमा केला जातो. याठिकाणी यापूर्वीही जप्त केलेली दारू चोरी गेली होती. परंतु सुरू असलेल्या संचारबंदीत शहरात अवैध दारू विक्री सुरू आहे. यात चोरट्यांनी अक्षरशः राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालयावर लक्ष केंद्रित केले आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नाशिक रोड येथील कारागृहामधील शिक्षा भोगत असलेला संशयित मंगल सिंग मिस्तरी शिंदे वय १९ रा. माच्छि बाजार, पेठ रोड, पंचवटी व रामदास बन्सीलाल पाडेकर वय ४० फुले नगर, पाटाजवळ, पेठ रोड यांनी व त्याच्या साथीदारांनी आदिवासी वसतीगृह परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात डल्ला मारला होता. २०११ मध्ये भरारी पथकाने मध्य प्रदेशमध्ये उत्पादित होणारी सुपर मास्टर ड्राय झीन हे विदेशी मद्य शहादा येथून छापा टाकून जप्त केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मंगल सिंग शिंदे व रामदास पाडेकर यांना ताब्यात घेतले आहे.